पगार 30 कोटी, काम एकदम शुल्लक; तरीही नाही कोणी करायला तयार, असं आहे तरी काय?

मुंबई : सध्याची बेरोजगारीची स्थिती बघता एखाद्या चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी लोक जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाण्यासाठी तयार होतील. कारण, सध्याच्या काळात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणं फार कठीण ठरत आहे; मात्र जगात अशी काही ठिकाणं आहेत जिथे काम करण्यासाठी कोणीही तयार होत नाही. गलेलठ्ठ पगार आणि इतर सुविधा देऊनही तिथे जाण्यासाठी कोणीही तयार नाही. सोशल मीडियावर अशीच एक जॉब ऑफर ट्रेंड करत आहे. या नोकरीसाठी 30 कोटी रुपये पगार दिला जाणार आहे. विशेष म्हणजे हा पगार फक्त एक बटण बंद करण्यासाठी दिला जात आहे. असं असूनही हे काम करण्यास कोणीही तयार नाही.

ही नोकरी इजिप्तमधल्या एका लाइटहाउसमध्ये आहे. लाइटहाउसवरचं नक्षीकाम कोणाचंही मन जिंकून घेऊ शकतं आणि त्याच्या आजूबाजूचं दृश्यही जणू स्वर्गाप्रमाणे सुंदर आहे. विशेषतः साहसप्रेमींसाठी हे सर्वोत्तम ठिकाण ठरू शकतं. तरीदेखील तिथे नोकरी करण्यासाठी कोणीही तयार होत नाही. सध्या सोशल मीडियावर या लाइटहाउसचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो पाहिल्यानंतर सर्वांचेच धाबे दणाणले आहेत.

हे लाइटहाउस इजिप्तमधल्या फॅरोस बेटावर आहे. तिथल्या अलेक्झांड्रिया किनाऱ्यावर एक सुंदर लाइटहाउस आहे. त्याला ‘फॅरोस ऑफ अलेक्झांड्रिया’ असंही म्हणतात. प्राचीन काळी कॅप्टन मोरेशियस या फॅरोसजवळ एका समुद्री वादळात अडकले होते. अंधारामुळे त्यांची बोट खडकाकडे वळवली गेली.

बोट खडकावर आदळून उलटली आणि अनेकांचा मृत्यू झाला होता. अशी दुर्घटना पुन्हा घडू नये म्हणून इजिप्तच्या तत्कालीन सम्राटाने एका वास्तुविशारदाला बोलावून अलेक्झांड्रियाच्या किनाऱ्यावर लाइटहाउस बांधण्याचा आदेश दिला.

हे लाइटहाउस कित्येक शतकांपासून जहाजांचं धोकादायक खडकांपासून संरक्षण करत आहे; पण तिथे राहणाऱ्या व्यक्तीला सतत मृत्यूचा धोका असतो. समुद्राच्या उंच लाटा कधीकधी या लाइटहाउसवर आदळतात. विशेषतः जेव्हा समुद्रात त्सुनामी येते, तेव्हा ते पूर्णपणे बुडतं. त्यामुळेच या ठिकाणी एक रात्र राहणंही धोकादायक मानलं जातं. फॅरोस ऑफ अलेक्झांड्रिया इथे काम करणं म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखं आहे. हे जगातलं सर्वांत कठीण काम असल्याचं म्हटलं जातं. तिथे काम करणाऱ्या व्यक्तीला वार्षिक 30 कोटी रुपये दिले जातात; मात्र त्या व्यक्तीने तिथे एकटं राहणं अपेक्षित आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.

Source link

marketmystique