मोठी बातमी! सिंधुदुर्गमध्ये एसटी बसचा भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस ओहाळात कोसळली! – News18 मराठी

सिंधुदुर्ग, विशाल रेवडेकर, प्रतिनिधी : सिंधुदुर्गमधून मोठी बातमी समोर आली आहे. एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली बस ओहळात कोसळली. वैभववाडी -कुसुर मार्गावर हा अपघात झाला आहे. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र या घटनेत नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामध्ये बसचं देखील मोठं नुकसानं झालं आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, समोरून येणाऱ्या दुचाकीला साईट देताना चालकाचं एसटी बसवरील नियंत्रण सुटलं, त्यानंतर ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या ओव्हळमध्ये कोसळली. या अपघातात सुदैवानं कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र या बसमधील नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  वैभववाडी -कुसुर मार्गावर हा अपघात झाला आहे.

बसचं नुकसान

दरम्यान या अपघातामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाहीये. नऊ प्रवासी जखमी झाले. तसेच बसचं देखील मोठं नुकसान झालं आहे. चालकाचं नियंत्रण सुटून हा अपघात झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.

  • First Published :

Source link

marketmystique