हैदराबाद : भारतात राजस्थानात गेलं की तुम्हाला वाळवंट पाहायला मिळेल. पण सौदी अरब असा देश जिथं वाळवंट मोठ्या प्रमाणात आहे. याच वाळवंटात भारतातील एक तरुण गेला. हा तरुण त्या वाळवंटात हरवला. त्यानंतर 4 दिवसांनी त्याचा मृतदेह सापडला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मोहंमद शेहजाद खान असं या तरुणाचं नाव आहे. 27 वर्षांचा मोहंमद मूळचा तेलंगणाच्या करीमनगरचा रहिवासी असलेला मोहंमद गेल्या तीन वर्षांपासून सौदीतील दूरसंचार कंपनीत काम करत होता. सौदीतील रब अल खान या वाळवंटात तो गेला. त्याच्यासोबत सुदान देशाचा एक सहकारीही होतो.
रब अल खान हे जगातील सर्वात धोकादायक वाळवंटापैकी एक. सौदी अरेबियाच्या 650 किलोमीटर लांबीपर्यंत हे वाळवंट पसरलं आहे.
नियतीचा अजब खेळ! 2 सख्ख्या बहिणी, दोघींनाही मृत्यूनं एकत्र गाठलं
सौदीच्या वाळवंटात त्यांच्यासोबत काय घडलं?
या वाळवंटात मोहंमद आणि त्याचा सहकारी दोघंही रस्ता चुकले. त्यात जीपीएस यंत्रणा बंद पडली. त्यामुळे त्यांना वाळवंटात वाट सापडली नाही. कोणाला फोन करतील तर त्यांच्या मोबाईल फोनच्या बॅटरीचं चार्जिंगही संपलं होतं. त्यामुळे ते कुणालाही मदतीला बोलावू शकले नाहीत. त्यांच्या गाडीतील पेट्रोलही संपलं. त्यांचे सर्वच मार्ग बंद झाले होते.
4 दिवसांनी सापडले मृतदेह
वाळवंटात भीषण ऊन, अन्न-पाणी नाही. अन्न-पाण्याशिवाय जगण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. पण त्यांचा जीव वाचला नाही. वाळवंटात अन्नपाण्याविना तडफडून त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतरच वाळवंटातून त्यांची सुटका झाली. 4 दिवसांनी त्यांचे मृतदेह गाडीजवळ सापडले.
मानवी शरीर किती तापमान सहन करू शकतो?
नेफ्रॉन क्लिनिकचे डॉ. संजीव बगई यांच्या मते, 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात अस्वस्थता जाणवू शकते. 40-42 अंशांपेक्षा जास्त तापमानात डोकेदुखी, उलट्या आणि डिहायड्रेशनचा अनुभव येतो. 45 डिग्रीमध्ये धडधडणे आणि रक्तदाब कमी होणं सामान्य आहे.
48-50 डिग्री सेल्सिअस आणि त्याहून अधिक तापमानात सतत संपर्कात राहिल्यास स्नायूंचा गंभीर बिघाड होतो आणि मृत्यू देखील होतो.
तापमानाचा मानवी शरीरावर कसा होतो परिणाम?
मानवी शरीर एका बिंदूपर्यंत उष्णतेशी जुळवून घेण्यास सुसज्ज आहे. परंतु एकदा शरीर उष्णतेवर प्रक्रिया करू शकले की, ते प्रथिने नष्ट करेल आणि मेंदूला नुकसान होईल. हा बदल ठराविक कालावधीत होतो आणि त्याचा त्वरित परिणाम होत नाही.
एकदा शरीराचे तापमान वाढले की, मेंदू माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी संघर्ष करू शकतो, संज्ञानात्मक कार्यामध्ये घट होऊ शकते, ज्यामुळे निर्णयावर परिणाम होऊ शकतो आणि लोकांना पडण्याचा धोका असतो. उच्च उष्णतेमुळे मेंदूचा दाह देखील होऊ शकतो.
फक्त मेंदूच नाही तर अति उष्णतेचा मानवी हृदय, किडनी आणि फुफ्फुसांवरही परिणाम होत असल्याचं दिसून येतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.