उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : आदर्श गाव नेमकं कसं असतं, आदर्श गावासाठी नेमकं काय करावं लागतं आणि आदर्श गाव म्हणजे नेमकं काय, या सर्व प्रश्नांची अनेकांना पडतात. पण या सर्व प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्रातील एका गावात पाहायला मिळतात.
दारू पिणाऱ्या व्यक्तीस, आणण्यासही बंदी –
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील जेकेकुरवाडी असे या आदर्श गावाचे नाव आहे. या गावाचे सरपंच अमर सूर्यवंशी आहेत. अमर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली फक्त 4 वर्षातच गावाने मोठा कायापालट केला आहे. या गावात दारू पिणाऱ्या व्यक्तीस प्रवेश बंदी आहे. तसेच गावात दारू आणण्यासही बंदी आहे. गावात गुटखा खाण्यास आणि विक्री करण्यासही बंदी आहे.
सायंकाळी टीव्ही आणि मोबाईल बंद –
तसेच याहून आणखी एक सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्यामुले बहुतांश तरुण मुले मुली, पालक, पुरुष, महिला या सर्वांचा मोबाईलवर रिल्स, व्हिडिओ पाहण्यात वेळ वाया जातो. त्यामुळे या गावात सायंकाळी 6 ते 8 वाजता टीव्ही आणि मोबाईल बंद केला जातो. विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा, म्हणून हा उपक्रम राबवण्यात येतो.
वाटाण्याच्या शेतीतून सासवडच्या शेतकऱ्याची कमाल! दुष्काळी भागातही घेतलं लाखाचं उत्पन्न, VIDEO
गावात भूमिगत गटारी, लोकसहभागातून ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाकडे, नारळाची झाडे आणि यावर्षी नुकतीच सरपंच अमर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी यावषी साडेपाच हजार वृक्षांची लागवड केली आहे. गावातील सर्व नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. या आदर्श गावात सर्व महापुरुषांच्या जयंत्या एकत्रितपणे साजऱ्या केल्या जातात.
सर्व धार्मिक सण आणि उत्सव एकत्रितपणे साजरे केले जातात. गावाचा सलोखा आणि ऐक्य हेच गावाला आदर्श करण्यासाठी मोठं पाठबळ देत आहे. त्यामुळेच फक्त 4 वर्षात गावाचा कायापालट झाला आहे आणि या पद्धतीने हे गाव एक आदर्श गाव म्हणून महाराष्ट्रात नावारुपाला आले आहे.
गावात विविध शासकीय योजनांचे नागरिकांना मार्गदर्शन केले जाते. शासकीय मोठ्या प्रमाणात राबवल्या जातात. त्यामुळे जेकेकुरवाडी गावाचा अगदी चार वर्षात कायापालट झाला आहे. गावाचा हा आदर्श अनेक गावांसाठी प्रेरणादायी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.